दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । युनिकॉमर्सचा भारतातील सर्वात मोठा ई-कॉमर्स समिट सरलने भारताच्या ई-कॉमर्स उद्योगाच्या वाढीला उत्प्रेरित करण्यात तंत्रज्ञानाच्या भूमिकेला साजरे केले. या इव्हेण्टमध्ये तंत्रज्ञान साधनांचा अवलंब करून कार्यक्षम ऑनलाइन व्यवसाय निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
डीपीआयआयटीचे माननीय अतिरिक्त सचिव श्री. अनिल अग्रवाल या इव्हेण्टचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी मुख्य भाषणात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘’ओएनडीसी प्रत्येक प्रक्रियेला विभागते, ज्यामुळे ई-कॉमर्स व्यवहार शक्य होतात. विक्रेता, खरेदीदार, पेमेंट सिस्टम आणि लॉजिस्टिक सेवा या प्रत्येक घटकाला स्वतंत्र सेवा बनवले जाते आणि या स्वतंत्र सेवांना प्रमाणित प्रोटोकॉलवर एकमेकांशी संवाद साधण्यास सक्षम केले जाते. सहयोगी प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही नेटवर्कला द्वितीय श्रेणीची शहरे व गावांपर्यंत घेऊन जाण्यासोबत स्थानिक विक्रेते व उद्योजकांना जागतिक व्यासपीठ देत सक्षम करू इच्छितो. तसेच आम्ही अशा क्षमता निर्माण करू इच्छितो, ज्यामुळे विक्रेत्यांना स्थानिक बाजारपेठेच्या गरजांची पूर्तता करण्यासोबत त्यांच्या उद्योगांना राष्ट्रीय उद्योग म्हणून उदयास आणण्यात मदत होऊ शकेल.’’
या समिटमध्ये ओएनडीसीचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. शिरीश जोशी आणि युनिकॉमर्सचे सीईओ कपिल माखिजा यांच्यात ओएनडीसी भारताच्या रिटेल उद्योगासाठी गेम चेंजर कसा बनला आहे यावर अत्यंत अपेक्षित झटपट चर्चा देखील झाली. उपस्थितांचे मार्गदर्शन करत श्री. जोशी म्हणाले, “आज कोणीतरी संपूर्ण एंड-टू-एंड प्रक्रियेशी संलग्न राहिले आणि ग्राहक व विक्रेता हे दोघेही एकाच व्यासपीठावर नोंदणीकृत असतील तरच ई-कॉमर्स शक्य होते. आम्ही स्थिर क्षमता म्हणून ओएनडीसीची निर्मिती केली आहे, ज्यामुळे जिगसॉच्या अनेक घटकांच्या संयोजनास एकत्र येण्यास आणि एकमेकांशी संवाद साधण्यास सुविधा मिळते. ओएनडीसीसह ई-कॉमर्स एका निश्चित पूर्वनिर्धारित सोल्यूशनमधून स्थिर यंत्रणेमध्ये बदलेल, जेथे ग्राहक व विक्रेते त्यांच्या गरजांच्या आधारे जोडले जातील. यूपीआय वापरून ज्या प्रकारे पेमेंट केले जाते, जेथे दोन पक्ष वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे युनिफाइड नेटवर्कवर एकमेकांशी व्यवहार करतात, अगदी त्याप्रमाणेच ओएनडीसी ईकॉमर्स ब्रॅण्ड आणि विक्रेत्यांना अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करेल.”
प्रत्येक वर्षी युनिकॉमर्स विक्रेत्यांना ई-कॉमर्स विक्री सुलभ करण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीकोनातून सरलचे आयोजन करते. सरल २०२२ मध्ये १००० हून अधिक किरकोळ ब्रॅण्ड व ईकॉमर्स कंपन्यांचा सहभाग होता आणि ३पीएल कंपन्या, ई-कॉमर्स एनेबलर्स, परफॉर्मन्स मार्केटर्स, अकाउंटिंग कंपन्या, डब्ल्यूएमएस प्रोव्हायडर्स, मार्केटप्लेसेस आणि रिटेल सल्लागार यांसारख्या विविध ई-कॉमर्स-संबंधित उद्योगांमधील व्यावसायिक प्रमुखांनी सहभाग घेतला होता. या समिटने गेल्या वर्षभरात ऑनलाइन उपस्थिती निर्माण करणाऱ्या व आशादायक भविष्य दाखवणाऱ्या कंपन्यांनाही मान्यता दिली आणि त्यांचा सत्कार केला.