नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  केले आहे.

हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास या पूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती पुरस्कारांसह) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. (दिव्यांग व्यक्तीचे वय दि. 8 मार्च 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे)

नारी शक्ती पुरस्कार उत्कृष्ट कार्यासाठी शक्यतो अपवादात्मक परिस्थितीत, महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण किंवा या विषयाशी संबंधित किंवा अनुषंगिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रदान केला जाऊ शकतो. ज्यांनी महिलांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, पारंपरीक आणि अपारंपरिक क्षेत्रात महिलांच्या कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिले, ग्रामीण महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, महिलांना गैर-परंपरिक क्षेत्र जसे की विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती, सुरक्षितता, आरोग्य आणि निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर आणि प्रतिष्ठा इत्यादींच्या दिशेने ठोस आणि लक्षणीयरीत्या प्रोत्साहन दिले अशा व्यक्तींना नारी शक्ती पुरस्कार दिला जाऊ शकतो. एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला देखील हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. ज्याने बाल लिंग गुणोत्तर (CSR) मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केल्यावर मृत्यू झाल्याची प्रकरणे वगळता सामान्यतः पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. वरील प्रमाणे कार्य केलेल्या व्यक्ती, राज्य व केंद्रशासित प्रदेश यांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यत प्रस्ताव सादर करावेत. सदरचे प्रस्ताव हे फक्त ऑनलाईनद्वारेच स्वीकारले जातील. असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे  महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!