दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृह, सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री मंडळातील अनेक मंत्री, भाजपा राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी, राज्यातील खासदार, आमदार व अन्य पदाधिकारी यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त दूरध्वनी, पत्राद्वारे शुभेच्छा देताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करीत त्यासाठीही सदिच्छा व्यक्त केल्या.
लोकनेते माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व मातोश्री श्रीमती मंदाकिनीदेवी नाईक निंबाळकर, काकी नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर यांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आशीर्वाद घेतले. अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, यांनी औक्षण केल्यानंतर खा. रणजितसिंह यांनी कुटुंबियांच्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केला.
राजभवन या येथील निवासस्थानी फलटण शहर व तालुक्यासह संपूर्ण माढा मतदार संघातून आलेले भाजपा पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या शुभेच्छा त्यांनी स्विकारल्या, गुच्छ, बुके, हार, पुस्तके, भेट वस्तू देवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रत्यक्ष भेट घेवून शुभेच्छा दिल्या. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यामध्ये मलटण येथील स्वयंभू त्रीजटेश्वर महादेव मंदिरात खासदार मित्रमंडळाच्या वतीने श्री महादेवाला अभिषेक करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी तालीम मंडळ व बबलू मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास २५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले १०० महिलांनी रक्तदान शिबिरास उपस्थित दर्शवली त्यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने २५ महिलांची हिमोग्लोबिन प्रमाण व्यवस्थित आढळल्याने त्यांचे रक्तदान स्वीकारण्यात आले.
बुध ता. माण येथील सौ पाटोळे यांच्या आत्मगिरी आश्रम शाळेत कु. ताराराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने धान्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.