दिवसभरात 80 बाधित, 14 मुक्त, दोघांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 03 : जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्हय़ात कोरोनाचे संकट अधिक गहिरे होवू लागले आहे. कोरोना बळींची संख्या अर्धशतकाच्या उंबरठय़ावर उभी असून दररोज हि संख्या वाढू लागलेलीआहे. बाधितांची संख्या जिल्हावासियांच्या मनात थरकाप उडवू लागलीय. यामध्ये मुंबई, पुण्याहून आलेल्या व येथे येवून बाधित झालेल्या नागारिकांच्या निकट सहवासातील बाधितांचे वाढते प्रमाण गंभीर होवू लागले आहे. जिल्हय़ाच्या कानाकोपऱ्यात कोरोना पोहचला असून संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेत जगण्याबरोबरच प्रशासनाने क्वांरटाईनबाबत कडक उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सकाळी 38 तर रात्री 42 नवे बाधीत आल्यामुळे बाधितांचा आकडा बाराशे पर्यंत पोहचल्याने सातारकरांना आता अक्षरशः धडकी भरली आहे.

जिल्ह्यात कडक प्रवेश बंदीचा मंत्री शंभूराज देसाईंचा आदेशकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमारेषेवर कुणीही विना पास आत येवू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तरीही नागरिक  पास नसतानाही जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणेनी कुणीही विना पास प्रवेश करणार नाही यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणेनी  काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असा कडक आदेश  गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिला आहे. 

दरम्यान, काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल  बाधित आले आहेत. तर सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु झाला तर जिल्ह्यातील 14 जाने कोरोना वर मात केली पासून कोरोनामुक्त झाल्याने या सर्वांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

 वाई तालुक्यात 14, खंडाळय़ात 5  

वाई तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16, 20, 40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष.

कराड तालुक्यात वाढ सुरुच

हॉटस्पॉट बनलेला कराड तालुका गत महिन्याच्या प्रारंभी कोरोना मुक्तीतकडे वाटचाल करु लागला असतानाच महिनाअखेरीस तालुका पुन्हा हॉटस्पॉट बनू लागला असून कराड शहरात देखील रुग्ण आढळून आलेले आहेत. गुरुवारी कराड तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, परभणीच्या 26 वर्षीय डॉक्टरचा रिपोर्ट कराडमध्ये आल्यानंतर पॉझिटिव्ह आलेले आहेत. 

सातारा 8, पाटण 4, कोरेगावात 2

सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी, खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील 40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक. कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु 

काल रात्री  सातारा येथील  गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची  माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. 54 वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता. 

कराड, पाटणच्या आठजणांची कोरोनावर मात

एकीकडे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना कोरोनामुक्तीचा वेग मंदावला असला तरी गुरुवारी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून 8 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील आचरेवाडीतील 38 वर्षीय पुरुष, धामणीचे 72 वर्षीय पुरुष, गोवरेतील 40 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगी, डिगेवाडीची 24 वर्षीय महिला, तुळसणची 45 वर्षीय महिला तर कराड तालुक्यातील तारुखच्या दोन युवक तर जावली तालुक्यातील गांजे येथील  24 वर्षीय पुरुष, म्हाते खु. येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय बालक. सातारा तालुकयात गोजेगाव 74 वर्षीय पुरुष, आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष. कोरेगांव तालुक्यातील नायगांव येथील 44 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

क मृत व्यक्तिसह 439 जणांचे नमुने तपासणीसाठी

सकाळी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल झालेल्या लिंब ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशयित म्हणुन उपचार करतेवेळेस त्याचा नमुना तपासणी करीता घेण्यात आला आहे.  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 55, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय  51, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव 3, वाई येथील 58, शिरवळ 57,रायगांव 3, पानमळेवाडी  31, मायणी 19, महाबळेश्वर 5, पाटण 44, खावली 31 असे एकूण 439 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

निकट सहवासीत वाढत आहेत 

पुण्या, मुंबईहुन जिह्यात आलेल्यापेक्षा आता त्यांच्या निकट सहवासीत असलेल्या लोकांमध्ये कोरोना पसरत असल्याचे समोर यायला लागले आहे. त्यामुळे सातारा जिह्याने अधिक सावधान होण्याची गरज आहे. गुरुवारी 38 पैकी 28 बाधित रुग्ण हे निकट सहवासीत प्रकारातले आहेत. त्यामुळे संसर्ग साखळय़ा निर्माण होण्याच्या आत त्या तोडण्यासाठी जिल्हय़ातील सर्व नागरिकांसह प्रशासनाने अर्लट राहण्याचा संदेश समोर येत असलेली परिस्थिती देत असून वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे भीती व मानसिक गोंधळाची अवस्था निर्माण होवू पहात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!