शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सासवडमधील डिपी कार्यान्वित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण तालुक्यातील झणझणे सासवड गावातील खताळ डिपीवर कनेक्शन धारक शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती व डिपीवरील वीजभार डिपीच्या क्षमतेपेक्षा प्रचंड होता. त्यामुळे वारंवार डिपी जळणे, वारंवार शेतक-यांचे शेतीपंप जळणे, मुबलक वीजभार उपलब्ध नसल्याने शेतीपंप चालू न होणे, परिणामी शेतक-यांची शेतपीके जळणे. आदी अनेक कारणांमुळे शेतकरी त्रस्त होता. नव्याने सुरू होणारा खताळ डिपी अंतर्गत अतिरिक्त वाघेश्वरी मंदिर येथील डिपीचे उद्घाटन होऊनही डिपी बसवण्यास विलंब झाला होता. नऊ महिने उभा असलेला सांगाडा डिपीच्या प्रतिक्षेत उभा होता, तसाच शेतकरीदेखील डिपी बसण्याची वाट पाहत होता. त्यातच मुळ खताळ डिपी जळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड उदासीनता व नाराजी पसरली होती.

खताळ डिपी व वाघेश्वरी मंदिर येथील अतिरिक्त डिपी बंद असलेबाबतची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आली होती.

सदर तक्रार आल्यानंतर शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, सासवड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य नंदकुमार झणझणे व अमोल रास्कर, सासवड ग्रामविकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन त्रिंबक झणझणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत झणझणे, बाजीराव झणझणे, सावता जाधव, भुजंग कारंडे, बाळासो भुजबळ, महेश कारंडे व आदी सर्व शेतक-यांनी फलटण येथील वीज महावितरण विभागीय कार्यालयात जाऊन फलटण विभागाचे सह मुख्य अभियंता गणेश जमाले यांची समक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देऊन लवकरात लवकर दोन्ही डिपी बसवण्याची मागणी करण्यात आली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन गणेश जमाले यांनी संबंधितांना तात्काळ डिपी बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे व सर्वांच्या एकजुटीमुळे दोन्ही डिपी जलदगतीने बसवण्यात आल्याची माहिती प्रदिप झणझणे यांनी दिली.

दोन्ही डिपी जलदगतीने बसल्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड आनंद व समाधान असल्याची भावना सासवड गावातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

सर्व शेतक-यांनी वीज महावितरणचे सह मुख्य अभियंता गणेश जमाले, काॅन्ट्रॅक्टर वैभव झणझणे, वीज महावितरणचे कर्मचारी वायरमन, आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!