दुधेबावीच्या विकास सोनवलकर यांचे धनगर आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात मुंडण


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | दुधेबावी | दुधेबावी ता. फलटण येथील विकास सोनवलकर यांनी धनगर आरक्षण साठी सरकारच्या विरोधात मुंडण करून निषेध व्यक्त केला आहे.

लोणंद ता. खंडाळा येथे गणेश केसकर यांनी सरकारच्या विरोधात उपोषण केले आहे. या उपोषणास विकास सोनवलकर यांनी भेट देऊन पाठींबा दिला व उपोषण ठिकाणीच मुंडण करून सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी खासदार विकास महात्मे, पुरुषोत्तम जाधव, गणेश केसकर यांच्यासह समाज बांधव मोठया सख्येने उपस्थित होते. विकास सोनवलकर यांच्या या निर्णयाचे समाजामधून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!