दुधेबावी सोसायटी सत्ताधारी राजे गटाने सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व अबाधीत राखले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । दुधेबावी । दुधेबावी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., दुधेबावी या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकित सत्ताधारी राजेगट पुरस्कृत दुधेश्वर पॅनलने सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व अबाधीत राखले आहे. निकालानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत राजे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ग्रामस्थांनी जल्लोषात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व सोसायटीचे विद्यमान चेअरमन माणिकराव सोनवलकर यांच्या नावाचा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला.

सर्वसाधारण मतदार संघात एकूण ८८२ मतदान झाले, त्यापैकी ६७ मते अवैध ठरली, ८१५ वैध मतांपैकी सर्वाधिक मते घेऊन दुधेश्वर पॅनलचे खालील उमेदवार विजयी झाले. कंसात त्यांना मिळालेली मते : सचिन यशवंत सोनवलकर (४७५), सखाराम मल्हारी सोनवलकर (४७०), मधुकर ज्योतीराम नाळे (४६४), बबन बापूराव ठोंबरे (४५७), राजेंद्रकुमार दत्तू नाचण (४५७), रोहिदास बबन सोनवलकर (४५१), आदिनाथ मारुती दडस (४४५), ज्ञानदेव रामू मदने (४२३).
महिला राखीव मतदार संघात एकूण ८८२ मतदान झाले, त्यापैकी ३६ मते अवैध ठरली, ८४६ वैध मतांपैकी सर्वाधिक मते घेऊन दुधेश्वर पॅनलच्या विजयी झालेल्या महिला उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते : निर्मला सुरेश नाळे (४६५), मिथाबाई बाळासाहेब सोनवलकर (४६३).

अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातील ८५४ वैध मतांपैकी ५१५ मते घेवून शामराव भीमराव मोरे, विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष राखीव मतदार संघातील ८४० वैध मतांपैकी ४८७ मते घेऊन शंभूराज माणिकराव सोनवलकर, इतर मागासवर्ग राखीव मतदार संघातून वैध ८६० मतांपैकी ४८३ मते घेऊन श्रीमंत बाबुराव नाळे विजयी झाले आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित संचालक व मतदारांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!