
दुधेबावी येथे कृषी महाविद्यालय फलटणच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महिलांना दुधापासून पनीर बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. घरगुती उद्योगातून उत्पन्नवाढीचा विश्वास निर्माण झाला.
स्थैर्य, दुधेबावी (फलटण), दि. ११ जानेवारी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दुधेबावी, ता. फलटण येथे महिलांसाठी उपयुक्त असा दुग्धप्रक्रिया उपक्रम राबविला. ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५–२६ अंतर्गत कृषीदूतांनी महिलांना दुधापासून व्यवसायिक दर्जाचे पनीर बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
ग्रामीण महिलांना घरगुती उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळावे, या उद्देशाने दुधेबावी गावात पनीर निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात कृषीदूतांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पनीर तयार करून दाखवले.
दुधाचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध पदार्थ तयार केल्यास अधिक नफा मिळू शकतो, ही बाब कृषीदूतांनी महिलांच्या निदर्शनास आणून दिली. पनीर इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत जास्त काळ कसे टिकवता येते, तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत, याची माहितीही देण्यात आली.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेले पनीर आणि सोपी पद्धत पाहून उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या घरगुती व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढू शकते, हा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला असून या उपक्रमाला गावातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, AIA प्रमुख डॉ. जी. बी. अडसूळ, विषय विशेषज्ञ प्रा. आर. डी. नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मनेरी व श्रीराम मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
