दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुयांव्यतिरित इतर तालुयांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्य ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे, अशा एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसद़ृश परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
या दुष्काळसदृश महसुली मंडळांमध्ये लागू करण्यात आलेल्या सवलती पुढीलप्रमाणे :
- जमीन महसुलात सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषीपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५% सूट
- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तेथे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे
फलटण तालुयातील दुष्काळसद़ृश सवलती लागू झालेली महसुली मंडळे पुढीलप्रमाणे :
- फलटण
- आसू
- होळ
- गिरवी
- आदर्की बु.
- वाठार (निं)
- बरड
- राजाळे
- तरडगाव
दरम्यान, नव्याने निर्माण झालेल्या महसूल मंडळांमध्ये सद्य:स्थितीत ऑटोमॅटिक वेदर स्टेशनद्वारे पर्जन्यमान मोजण्याची कार्यवाही अद्याप चालू झालेली नाही. त्यामुळे कोळकी मंडळ पूर्वी ज्या मंडलात येत होते, त्याच्याच अंतर्गत त्यांनाही सवलती लागू होतील, अशी माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.