वेळोशीत कृषीदुतांकडून ठिबक सिंचनाचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2025 अंतर्गत ’आधुनिक कृषि सिंचन तंत्रज्ञान (ठिबक सिंचन)’ या विषयावर वेळोशी, ता. फलटण येथे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले .

यावेळी कृषीदुत अविनाश चव्हाण, रोहित शिंदे, आदित्य शिंदे, समाधान शिंदे, चैतन्य बोडरे, रोहन पवार, दयासागर पाटील यांनी ठिबक सिंचन प्रणाली व त्याच्या विविध भागांची माहिती शेतकर्‍यांना सांगितली. ठिबक सिंचन प्रणालीच्या विविध भागांची माहिती तसेच विविध फायदे पोस्टरच्या माध्यामातून दाखवण्यात आले. यामध्ये 70 ते 90 % पाण्याची बचत होणे, गवताच्या वाढ नियंत्रित होणे, पाण्यातून खते सोडणे मातीची धूप कमी होणे इत्यादी फायदे व सरकारकडून ठिबक सिंचनासाठी देण्यात येणार्‍या सवलतींची माहिती दिली.

यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. सौ. एन. एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एस. एम. साळुंखे, प्रा. सौ. एन. ए. पंडीत यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी श्री शशिकांत नलवडे, प्रवीण माने, अक्षय नलवडे, आकाश नलवडे, अक्षय फडतरे, अलका नलवडे, संदीप रोमन इत्यादी शेतकरी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!