दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२४ | फलटण |
‘ड्रिमिया’ या नावाप्रमाणेच ही वनस्पती पाहायला मिळणे, हे स्वप्नच असते. कारण उन्हाळ्यात कोरड्या रानामध्ये येणारे हे अत्यंत दुर्मिळ फुल कधी येईल आणि कधी उमलून गेलेलं असेल, याचा निश्चित काळ नाही. काही वेळेला फ्लोवेरिंग पूर्ण होऊन गेलेलं असते, बिया असतात, पण फुले मिळतीलच याची शाश्वती नाही.
शनिवारी नशिबाने हा एकदम सुंदर उमलेला खपवर्ळींळर्वीरश्र मिळाला. ही वनस्पती अत्यंत कोरड्या ठिकाणी आणि गवताच्या मुळाशी उगवून येणारी, कांद्याच्या कुळातील असून याच्या १२ ते १३ तशअॅळीूं आपल्याकडे आहेत. प्रदेशनिष्ठ असल्याने खूप दुर्मिळ होत चालली आहे. ‘ड्रिमिया’ला पावसाळ्यात पाती येऊन जातात आणि उन्हळ्यात फुले येऊन फळे येऊन काळ्या रंगाच्या बिया येतात. या बिया पडून जमिनीवर वळीवामध्ये रुजतात.
नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे वन्यजीव अभ्यासक गणेश धुमाळ यांना हे फुल फलटण तालुक्यात आढळले.
PLANT INFORMATION🌳
🍂Botanical Name- Indurgia raogibikei (Hemadri) Mart.-Azorín, M.B.Crespo, M.Pinter & Wetschnig🍂
🍂 Synonyms- Drimia raogibikei (Hemadri) Hemadri🍂
🍂Common Name- Rao Squill🍂
🍂मराठी नाव- 🍂
🍂Family- Asparagaceae (Asparagus family)🍂