
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । येथील आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी युवा नेते सागर कांबळे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.