
दैनिक स्थैर्य । 15 एप्रिल 2025। फलटण । येथील आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी आमदार दिपक चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन यांनी अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे, श्रीराम कारखाना संचालक महादेवराव माने, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, गणेश शिरतोडे, प्रशांत अहिवळे, मंगेश आवळे, रामभाऊ मदने, अय्याज शेख, हरिष काकडे,
संग्राम अहिवळे, लक्ष्मण काकडे, गणेश बिर्हाडे, रोहित विलास अहिवळे, दत्तात्रय मोहिते, प्रशांत अहिवळे, पॅन्थर महिला संघटना डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.