दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२३ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना एस. टी. स्टँड येथे १४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या, कोविड काळात अल्प दरात रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, पशूवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील, पोलीस, रिक्षाचालक यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व रिक्षा चालक-मालक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी रॅलीने जाणार असून पुष्पहार अर्पण करून आल्यानंतर दुपारी १२.०० वाजता अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संघटनेचे अन्नदानाचे हे २० वे वर्ष आहे.
या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना एस. टी. स्टँड, फलटण या संघटनेच्या संयोजकांनी केले आहे.