‘फलटण नगरीच्या पाऊलखुणा’ ग्रंथाचे डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
प्रदीर्घ इतिहास असलेल्या फलटणनगरीचा सर्वांगीण परिचय करून देण्याच्या हेतूने प्रा. विक्रम आपटे आणि श्री. उदयसिंह पवार या लेखकव्दयीने लिहिलेल्या ‘फलटण नगरीच्या पाऊलखुणा’ या ग्रंथाचं प्रकाशन भारती विद्यापीठ, पुणे या अभिमत विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. शिवाजीराव कदम या यांच्या हस्ते मुधोजी दिनाच्या म्हणजेच सोसायटी दिनाच्या मुहूर्तावर झाले.

उभय लेखक हे मुधोजी महाविद्यालयाचे म्हणजेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे निवृत्त कर्मचारी असल्यामुळेच त्यांनी या दिवसाची योजना या प्रकाशनासाठी केली. फलटणनगराचा विविध अंगांनी परमर्ष घेण्याचा प्रयत्न यात दिसतो.

नगराची ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी, संस्थानाची माहिती, विविध उद्योग-व्यवसाय, तिथं होऊन गेलेले संत-महात्मे, उद्योगपती, सुप्रसिध्द व्यक्ती, मंदिरे, दक्षिण काशी म्हणून असलेलं महत्त्व, शिक्षणसंस्था, पौराणिक वारसा असलेल्या इमारती, यात्रा, ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम, नगरीच्या आसपासची पाहाण्यासारखी स्थाने अशा विविध अंगांनी या नगरीचा परामर्ष घेणारं हे पुस्तक संग्राह्य आहे, असं मत या लेखकांशी बोलताना आदरणीय डॉ. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

कार्यक्रमाला फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, आमदार श्री. दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि संस्थेत काम करणारे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!