दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपूर पूल, जिंती नाका पूल, इरिगेशन बंगला, कोळकी येथे अनंत चतुर्थीदिवशी अंदाजे ९ ते १० टन निर्माल्य गोळा करण्यात आले.
गुरुवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले. अंदाजे ९ ते १० टन निर्माल्य सकाळी ७.०० वाजल्यापासून रात्री ८.०० वाजेपर्यंत ३५० ते ४०० श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले. पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा, या हेतूने गेल्या ६ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो.
निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे. या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.