फलटणमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस उजाळा

जागतिक मंदीतून भारताची अर्थव्यवस्था मजबूत करणारे डॉ. मनमोहन सिंग


दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक किर्तीचे जेष्ठ अर्थतज्ञ पद्मविभूषण डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देऊन श्रध्दांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.

तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक मंदी असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “असा अर्थतज्ञ पुन्हा होणे नाही.” या शब्दांतून त्यांनी डॉ. सिंग यांच्या अद्वितीय क्षमतेचा गौरव केला.

फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या या सभेत जिल्हा काँग्रेसचे अ.जा.सेलचे उपाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव लोखंडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गंगाराम रणदिवे, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, शहर काँग्रेसचे खजिनदार बालमुकंद भट्टड तसेच शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी सर्व नितीन जाधव, मंजेखान मेटकरी, अजय इंगळे, धनंजय गोरे, सुधीर शिंदे, सुभाष गायकवाड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!