दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील गुणवरे गावची मूळ रहिवासी असणारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. विलास आढाव यांची कन्या डॉ. मल्लिका विलास आढाव हिची उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील प्रतिथयश विद्यापीठांमध्ये निवड झाली आहे.
डॉ. मल्लिका आढाव व तिचे कुटुंब मूळ गुणवरे, तालुका फलटण येथील रहिवासी असून शिक्षण व नोकरीनिमित्त ते पुणे या ठिकाणी स्थायिक झाले आहे. त्यांच्या कुटुंबात शिक्षणाची मुहूर्तमेढ डॉ. मल्लिकाचे आजोबा कालकथित समाजसेवक बी. पी. आढाव यांनी रोवली. त्यानंतर डॉ. मल्लिका हिचे मोठे चुलते श्री. चंद्रकांत बबनराव आढाव हे पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवडून गेले व रजिस्टार झाले. डॉ. मल्लिका हिने पुण्यातून बी. डी. एस. ही दंतवैद्यक क्षेत्रातील पदवी प्राप्त केली व त्यातच उच्च शिक्षण घेण्यासाठी ती ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील वैद्यकीय विद्यापीठात दाखल झाली आहे.
डॉ. मल्लिका हिची आई जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पुरवठा शाखेतील तहसीलदार या पदावर कार्यरत असून वडील डॉ. प्रोफेसर विलास आढाव हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार विभागाचे आजीवन संचालक असून अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. मल्लिका यांचे संपुर्ण कुटुंब उच्चशिक्षित असून उच्चपदावर कार्यरत आहे.
या यशाबद्दल डॉ. मल्लिका आढाव यांचेसह त्यांच्या कुटुंबाचे फलटण, पुणेसह पंचक्रोशीतील लोकांनी अभिनंदन केले असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.