
स्थैर्य, फलटण : येथील प्रसिद्ध डॉक्टर जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटलचे सिल उघडले असून निकोप हॉस्पिटल हे सर्वांसाठी आता खुले झालेले आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
डॉक्टर जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी सुविधांचा समावेश असल्याने व निकोप हॉस्पिटल येथे गंभीर आजारांवर त्वरित उपचार करीत आहेत. फलटणमधील महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये निकोप हॉस्पिटल हे समाविष्ट आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी निकोप हॉस्पिटलचे सील प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहे असेही प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.
निकोप हॉस्पिटलच्या वतीने डॉ. जे. टी. पोळ कोरोना रुग्णांसाठी स्पेशल ऑक्सिजन असलेला व अत्यावश्यक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेला दहा बेडचा आयसीयू लवकरात लवकर कोरोना रुग्णांच्या सेवेत रुजू करत आहेत, अशी ग्वाही त्यांच्याकडून दिल्यानंतर प्रशासनाच्यावतीने निकोप हॉस्पिटलचे सील काढलेले आहे व निकोप हॉस्पिटल हे तालुक्यातील सर्व गोर गरीब रुग्णांसाठी खुले झालेले आहे, असेही प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.