डॉ. दीपक हरके यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । बारामती । आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशन सह विविध शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून एज्यु यूथ मीट कार्यक्रम कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 1,26,613 विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेण्याचा जागतिक विक्रम केला. इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस्चे राष्ट्रीय सचिव व प्रजापिता ब्रम्हकुमारी बारामती चे समनव्यक डॉ. दीपक हरके यांनी यावेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना विश्व विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांसह शिक्षण क्षेत्रातील लोक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!