डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विधानभवन येथे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । मुंबई । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासंदर्भात विशेष उपक्रम राबविणाऱ्या वाचनालयांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी 10 लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला. यासंदर्भात उपसभापती कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विधानमंडळाचे उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, सचिन चिखलकर आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!