डॉ. गौरी गायकवाड यांना पीएच.डी. पदवी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागातील डॉ. गौरी हेमकांत गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नुकतीच विद्यावाचसप्ती (पीएच.डी.) ही सन्माननीय पदवी मिळाली.

तत्त्वज्ञान विभाग प्रमुख व मार्गदर्शक डॉ. श्रीधर आकाशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधनाचे काम पूर्ण केले आहे. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्त्रीविधायक दृष्टीकोन : एक अभ्यास’ या विषयावर संशोधन केलेले आहे. याबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निबांळकर, फ. ए. सोसायटीचे गव्हनिर्ंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निबांळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निबांळकर, उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एच. कदम, उपप्राचार्य एस. जी. दीक्षित, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागातील विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. के. रासकर आणि सर्व सहकारी, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते व माजी सरपंच गणपत सस्ते, तसेच समस्त सस्ते परिवार, निरगुडी आणि गायकवाड परिवार मांजरवाडी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजकीय व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!