डॉ. आंबेडकर प्रेमींना प्रतिवर्षा प्रमाणे लिंबू सरबत, ताक, थंड पाणी वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन व मिरवणुकीसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या डॉ. आंबेडकर प्रेमी मंडळींना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लिंबु सरबत, ताक, थंड पाणी वितरीत करण्यात आले.

फलटण तालुक्यातील वंचित ‌‌बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, ‌भारतीय बौद्ध महासभा, लहुजी शक्ती सेना या संघटनांच्या संयुक्त सहभागाने हा उपक्रम राबविण्यात आला त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात बुद्ध पुजा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, फलटण तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेंडे, अड. जीवन पवार, राहुल कांबळे, कन्हय्या रीटे, अमीत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, पै. रोहित गायकवाड, सुखदेव रणदिवे, अमोल लोंढे, सचिन रणदिवे, विजय कांबळे, भारतीय बौद्ध महासभा महावीर भालेराव, मोहीते सर, विठ्ठल निकाळजे, महेंद्र भोसले, बाबासाहेब जगताप, परमेश्वर कांबळे, तसेच लहुजी शक्ती सेना विजय घोलप व त्यांचें सहकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!