दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । फलटण । मिस्टर इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन 2022 या स्पर्धेत फलटण येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांनी विजयी होऊन यश संपादन केले आहे. यावेळी संचालिका सुनीता भगत , ग्रूमर डॉ .वर्तिका मॅम, सुनीता भगत यांनी आयोजित केलेल्या “इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन सीझन 2” च्या ग्रँड फायनलमध्ये दीपशिखा नागपाल, अमन वर्मा हे प्रमुख पाहुणे होते. सुनीता भगत या शोच्या दिग्दर्शक आणि संयोजक असून शोच्या ज्युरी सदस्यांमध्ये रामकुमार पाल, विद्या भुले, मोहिनी पालनकर (शो स्टॉपर), वर्तिका पाटील, अमिता कुमार आणि डॉ. उषा काळे यांचा समावेश होता. या स्पर्धेत डॉ. दत्तात्रय सोनवलकर (पुणे) यांना मिस्टर कॅटेगरी ऑफ इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन सीझन 2 चे विजेते घोषित करण्यात आले.
डॉ. दत्तात्रय सोनवलकर हे एम.एस.लँप्रोस्कोपीक व काँस्मेटिक गायनेकलाँजीस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्ययालय चे विद्यार्थी असल्याने त्यांना आद्यत्माचा सखोल अभ्यास असल्याने त्यांना या स्पर्धेत उपयोगी ठरला आहे.
तसेच त्यांची कॉलेज डे पासून मॉडेलिंग ही फँशन असल्याने त्यांना ही स्पर्धा सहज जिकंता आली .त्यांना व्ययामाची आवड असल्याने त्यांनी फिटनेस छान जपला आहे.ते एक समाज व तरुण वर्ग साठी रोल मॉडेल ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल फलटण च्या वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.