डॉ. चिमा यांनी उद्यान शास्त्रात क्रांती घडवली : डॉ. निंबाळकर


स्थैर्य, फलटण, दि. 05 ऑगस्ट : भारतीय उद्यानशास्त्राचे पितामह डॉ. जी. एस. चिमा यांची जयंती येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयात उत्साहात साजरी झाली.

‘डॉ. चिमा यांनी फळबाग व भाजीपाल्यामध्ये ‘गणेश’ द्राक्ष व ‘सरदार’ पेरू यांसारखे संकरित वाण निर्माण करून उद्यान शास्त्रात मोठी क्रांती घडवली,’ असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी यावेळी काढले.

कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण व प्रा. ए. डी. पाटील यांनीही डॉ. चिमा यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!