फलटणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी


स्थैर्य, फलटण, दि. १५: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती फलटणमध्ये अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण नगरपरिषदेचे आरोग्य व वैद्यकीय सभापती सनी अहिवळे, हरीश आप्पा काकडे, युवा उद्योजक संग्राम अहिवळे, अक्षय अहिवळे यांनी भारतीय संविधान उद्देश पत्रिका मान्यवरांना देवून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली.

फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या संविधान उद्देश पत्रिकेचे वाटप फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बेडके, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंन्द्रे, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष रणधीर भोईटे, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख आदी मान्यवरांना ही उद्देश पत्रिका देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय येवले, शामराव अहिवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!