
दैनिक स्थैर्य । 13 एप्रिल 2025। फलटण । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने यावर्षी डॉ. आंबेडकर यांचा 134 वा जयंती महोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
रविवार दि. 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात येणार आहे. सोमवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मंगळवार पेठ येथील जुनी चावडी येथे भीमज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे.
सायंकाळी 7 वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन रात्री मंगळवार पेठ येथे विसर्जित करण्यात येणार आहे.
दरम्यान महोत्सव समितीच्या माध्यमातून दि. 1 एप्रिल पासून दररोज एक याप्रमाणे शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले, त्यावेळी या महापुरुषांच्या जीवन चरित्राची माहिती देणारी पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
महोत्सव समितीवतीने शहरातील सर्व अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आहे.
फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.