डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह सातारा येथे प्रवेश सुरु


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२३ । सातारा । सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे  शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता आठवी ते पदवी / पदवीत्तर पर्यंत घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनाथ व अपंग या सवंर्गातील विद्यार्थ्यांना  मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशित विद्यार्थ्यांना  राहण्याची, जेवण्याची मोफत व्यवस्था केली जाते. शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदीकरिता रोख रक्कम दिली जाते.

तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनाथ व अपंग या संवर्गातील विद्यार्थ्यांनी गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा यांच्याशी  त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन वार्डन मुलांचे शासकीय वसतीगृह,  गोडोली, सातारा यांनी  केले आहे.


Back to top button
Don`t copy text!