दैनिक स्थैर्य | दि. ४ मार्च २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे कार्यरत असणारे डॉ. रविंद्र काळेबेरे यांना शैक्षणिक तसेच पिण्याचे पाणी व प्रदूषित पाणी यावर विशेष संशोधन केल्याबद्दल नवी दिल्ली येथे मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओमकार सिंह मरकाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शक्ति मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त श्रेया एज्युकेशन फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने ग्रामीण भारतातील संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना सन्मानित करत देशाच्या विकासात हातभार लावणार्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो.
सन २०२३-२४ मध्ये संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात प्रा. डॉ. रविंद्र काळेबेरे यांनी ग्रामीण तसेच शहरी भागातील एक मोठी समस्या असणार्या पिण्याचे पाणी व प्रदूषित पाणी यावर उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभात मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओमकार सिंह मरकाम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विकास दिव्य किर्ती, पद्मश्री विजेते अर्जुन सिंह ध्रुव आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. काळेबेरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.