
दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुषहार घालुन अभिवादन केले.
यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व अन्य मान्यवर तसेच विधान मंडळ सचिवालय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					