अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र वडिलांना वाई पोलिसांनी केली अटक


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । वाई । सोमजाई नगर येथील १७ वर्षाच्या सावत्र मुलीवर पित्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सावत्र पित्यास अटक केली आहे.

पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची आई या दोघी भाडयाच्या खोलीत राहतात. तेथे तिचा सावत्र वडिल आई घरात नसताना २०१६ पासून ते दि. ९ एप्रिल २०२३ पर्यंत यायचा अन् बळजबरीने अत्याचार करुन कोणाला काही सांगितलेस तर जीवे मारण्याची धमकी द्यायचा. ही बाब मुलीने तिच्या मामाला व नातेवाईकांना सांगितली. यानंतर याबाबतची फिर्याद तीने वाई पोलीस ठाण्यात केली. हे प्रकरण गंभीर असल्याची बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संबंधित संशयित सावत्र वडिलांना अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यास रात्री अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयिताला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!