
दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । जागतिक महिला दिनानिमित्त फलटण शहर भारतीय जनता पार्टी व माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राजमाता राणी अहिल्यादेवी पुरस्कार डॉ. आम्रपाली कोकरे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार श्रीमती मंदाकिनी नाईक निंबाळकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मानभाव परिषदेचे अध्यक्ष महंत शामसुंदरशास्त्री विध्वंस उपस्थित होते.
डॉ. आम्रपाली कोकरे म्हणाल्या, मल्हारराव होळकर यांनी सर्वप्रथम स्त्रियांना समानतेची वागणूक द्यायला सुरुवात केली. दातृत्व व कर्तृत्व याचा संगम म्हणजे मल्हारराव होळकर होय. अखंड भारतावर भगवा फडकवण्यामध्ये मल्हारराव होळकर यांचे योगदान खूप मोठे राहिले आहे. या पुरस्काराने मला एक प्रकारची उर्जा मिळाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष फलटण अनुप शहा यांनी स्वागत केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.