डॉटपेचा व्यापा-यांकरिता ‘फ्री डिलिव्हरी’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । मुंबई । महामारीदरम्यान प्रत्यक्ष दुकानातील खरेदी कमी झाली, मात्र ऑनलाइन ऑर्डर आणि रिमोड डिलिव्हरी हे भारतातील व्यापाऱ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले. तरीही बहुतांश व्यापारी सेवा प्रदात्यांना द्यावे लागणारे कमिशन आणि डिलिव्हरी शुल्क यामुळे त्रासलेले आहेत. परिणामी सध्याच्या संकटकाळात त्यांना कमी मार्जिन मिळत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी, गुरगाव येथील ओटूओ कॉमर्स प्लॅटफॉर्म डॉटपे ने रेस्टॉरंट्स, किराणा दुकाने, एफअँडव्ही व्यापारी, मांस व कुक्कटपालनाची दुकाने तसेच उपयुक्त वस्तूंच्या इतर विक्रेत्यांच्या व्यवसायासाठी ‘फ्री डिलिव्हरी’ देण्याचे जाहीर केले आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून, व्यापाऱ्यांना सदस्य होण्याच्या वेळी वन-टाइम सबस्क्रिप्शनचे शुल्क आकारणे डॉटपे तर्फे कायम ठेवले जाईल. मात्र व्यवसायांमध्ये केलेली गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘फ्री डिलिव्हरी’चे लाभ व्यापाऱ्यांना महत्त्वाचे ठरतील. सबस्क्रिप्शन पॅकेजनुसार, व्यापाऱ्यांना २५० पर्यंत फ्री डिलिव्हरी दिल्या जातील. ऑनलाइन शॉपिंगची सुविधा ग्राहक कधीही टाळू शकणार नाहीत, हे लक्षात घेता, डॉटपेची ही सुविधा या इंडस्ट्रीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.

डॉटपेचे सह संस्थापक आणि सीईओ श्री शैलाज नाग म्हणाले, “तिसरी लाट कधीही येऊन धडकेल, असा अंदाज वर्तवला जात असताना देशासाठी हा खूप कठीण काळ आहे. लोक सतत भीतीत वावरत असून एका सुरक्षित कवचातून बाहेर पडणे त्यांना अवघड वाटत आहे. ऑनलाइन शॉपिंग हा त्यांच्यासाठी एकमेव पर्याय असून, स्थानिक व्यापऱ्यांना अशा प्रकारच्या कठीण काळात तग धरण्यासाठी मदत करण्याची हीच संधी आहे, असे डट पे ला वाटते. या क्षेत्राच्या वृद्धीच्या दिशेनेच आमचे प्रयत्न नेहमी चालत असतात, त्यामुळे व्यापारी आणि रिटेलर्सना फ्री डिलिव्हरी सेवा प्रदान करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.”


Back to top button
Don`t copy text!