स्थैर्य, फलटण, दि. ३१ : सध्या करोनाच्या विळख्यात संपूर्ण जगाला ग्रासले आहे. WHO च्या रिपोर्ट नुसार आपल्या देशात मेडिकल बाबतीत पुढारलेला नाही त्या मुळे जर भारत देशात करोनाने थैमान घातले तर देशाला खूप मोठा तोटा होईल. फलटण येथील जे नागरिक आहेत त्यांना करोना झाला नाही. परंतु मुंबई व पुणे येथून आलेले आहेत त्यांना करोना झालेला आहे. आताच्या करोनाच्या ह्या परिस्थितीत तालुक्यातील कोणीही एकटं आहे असं समजू नका, मी व आमचे कुटुंबीय आपल्या सोबत कायम आहे व राहणार असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी काल आंदरूड ता. फलटण येथे व्यक्त केले.
आंदरूड ता. फलटण येथे करोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित केली होती. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, संचालक विनायकराव पाटील, मोहनराव निंबाळकर, आंदरूडचे सरपंच सौ. सुवर्णा बोराटे, ग्रामसेवक, पोलीस पाटील हनुमंत हरिहर, तलाठी महावीर अहिवळे, हरिभाऊ राऊत, ज्योतिराम वाघ, शरद राऊत, बबन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील लोकांची प्रतिकारशक्ती जास्त आहे. मुंबई व पुणे येथून आलेल्या माणसांना सक्त रित्या गृह विलीगिकरण करणे गरजेचे आहे. मुंबई व पुणे येथून आलेल्यांना एक कळकळीची विनंती आहे की बाहेर पडू नका. आपल्या येथील जेष्ठ म्हणजेच वडीलधारी माणसांना जर मुंबई व पुणे येथून आलेल्यांमुळे करोना होऊ शकतो. त्या मुळे काळजी घेणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील माणसांना करोना होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेत आहोत व त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबई व पुणे येथून आलेले जर कोणी आडग वागत असेल तर त्यांना संस्थांमक विलीगिकरण करण्यासाठी फलटणला पाठवा. कृष्णा हॉस्पिटलमध्ये फलटण येथील पेशंट साठी एक वेगळा वार्ड आहे व त्या साठी स्वतंत्र ऑफिसर नेमले आहेत. कृष्णा हॉस्पिटलचे भोसले कुटुंब आपल्या सोबत आहे. करोनाची साखळी आपल्या तालुक्यात तयार होऊ देऊ नका.
करोनाची साखळी तयार न होऊ देण्यासाठी सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्क वापरणे गरजेचे आहे. पोहायला जाणे टाळावे. वारंवार हात साफ करणे गरजेचे आहे. आता करोना बरोबर जगायला शिकले पाहिजे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी व्यक्त केले.
धोम बलकवडी मुळे जे पाणी आज आमच्या भागात आलेले आहे त्या मुळे गावातील बहुतांश शेतकरी यांनी कांदा व डाळिंब पिकवले आहे व करोनाच्या परिस्थितीत बाजार समिती सुरू ठेवून आमच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळवून दिल्या बद्दल विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानत श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्वतः येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल आंदरूड ग्रामस्थांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक पाटील यांनी मानले.