
स्थैर्य, फलटण, दि. १६ : सध्या कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. या मुळे हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी मोफत सुरु करण्यात आलेली आहे. या मध्ये फलटण शहरामधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्नपूर्णा शेतकरी कँटीन येथे शिवभोजन थाळी केंद्र मंजूर आहे. शिवभोजन थाळीची मर्यादा संपल्यावर मालोजी शिदोरी मधून थाळी उपलब्ध करून द्या कोणत्याही परिस्थितीमध्ये गरजुंना उपाशी पाठवू नका, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले आहेत, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.