मोबाईल चा अतिरेक नको, आवश्यक वापर करा : प्रा नितीन बानगुडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२२ । बारामती । विद्यार्थ्यांनी क्षमता व कल ओळखून करिअर निवडा, झोकून द्या ,अडथळे ,,खडतर परिस्थिती कौशल्य बाहेर काढण्यासाठी येतात संकटे उपजत गुणाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे असा सकारत्मक विचार करा असा सल्ला प्रसिद्ध प्रेरक व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी दिला.

आचार्य अकॅडमी च्या वतीने नवीन वर्षानिमित्त व ए टी एस ई परीक्षा मध्ये रँकिंग मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी बानगुडे-पाटील बोलत होते. या प्रसंगी आचार्य अकॅडमी चे संचालक प्रा .ज्ञानेश्वर मुटकुळे, प्रा. सुमित सिनगारे,प्रा. प्रवीण ढवळे, कमलाकर टेकवडे, आणि बापूराव काटकर, संतोष पांडे , बारामती नगरपरिषद च्या महिला बालकल्याण च्या अधिकारी आरती मुटकुळे,अजितदादा इंग्लिश मिडीयम चे संचालक संग्राम मोकाशी,बांधकाम व्यवसायिक राजेंद्र इंगोले आदी मान्यवर उपस्तीत होते.
मोबाईल चा आवश्यक तेवढा वापर करा, मोबाईवर अवलंबून न राहता गणित, भूमिती व कोणताही विषय सहज सोडवता आले पाहिजे, मैदानी खेळ वाढवा व मोबाईलवर वरील गेम्स खेळू नका.वेळेचे योग्य नियोजन, सातत्य, व जे मिळवायचे त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तुम्हाला जीवनातील यश मिळवून देतील असा सल्ला देताना शिवाजी महाराज, शास्त्रज्ञ,खेळाडू यांचे उदाहरणे देत विद्यार्थी ,पालक यांची मने जिंकली.

आचार्य अकॅडमी चे योग्य मार्गदर्शन व घरची बेताची परिस्थिती मुळे यश मिळवण्याची आशा निर्माण झाली व त्या साठी केलेला सराव मुळे यश मिळाल्याचे आर्मी टीईएस परीक्षेत देशात सहावा आलेला प्रज्वल राऊत आणि त्याचे बंधू प्रणव राऊत यांनी सांगितले.
स्वप्न पालक व पाल्य यांचे तर आचार्य अकॅडमी चे अचूक मार्गदर्शन या मुळे अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर व आर्मी नेव्ही एयरफोर्स मधील अधिकारी घडत आहे. गुणवत्ता पूर्वक शिक्षण देताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थापक संचालक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार बापूराव काटकर यांनी मानले. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण आदी तालुक्यामधून पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


Back to top button
Don`t copy text!