
दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। सातारा। लोकसंख्येच्या निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करण्यात येते. या तरतूदींनुसार सातारा जिल्ह्यामध्ये 1 हजार 152 आपले सरकार सेवा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.
आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील सीएससी- एसपीव्ही कडे ऑनलाईन नोंदणीकृत सीएससी केंद्रचालकांकडून आणि सीएससी- एसपीव्हीचे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविणेत आलेले आहे. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दिनांक शुक्रवार दि. 21 मार्च होती. त्यानूसार एकूण 2 हजार 32 आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दाखल झालेले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडून त्रयस्थ व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करु नयेत. तसेच याकामासाठी कोणी पैशांची मागणी केल्यास या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. याबाबत कोणत्याही स्वरुपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत असेही उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.