
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.११: देशांतर्गत हवाई प्रवासासाठी आता तुम्हाला 30% जास्त खर्च करावे लागतील. सरकारने वेगवेगळ्या रुटसाठी निश्चित केलेले विमान भाडे वाढवले आहे. यासोबतच एअरलाइन कंपन्यांवर प्री-कोविड लेव्हलच्या तुलनेत जास्तीत जास्त 80% क्षमतेसोबत फ्लाइट ऑपरेट करण्यासाठी लावण्यात आलेली मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
किमान भाड्यांमध्ये 10% आणि जास्तीत जास्त भाड्यामध्ये 30% वाढ झाली आहे. नवीन प्राइस बँडनुसार, दिल्ली-मुंबई मार्गावरील इकॉनॉमी क्लासमधील एकेरी भाडे आता 3,900 ते 13,000 रुपयांपर्यंत असेल. पहिले हे 3,500-10,000 रुपयांच्या जवळपास होते. यामध्ये विमानतळाचा यूजर डेव्हलपमेंट शुल्क, प्रवासी सुरक्षा शुल्क (देशांतर्गत मार्गावरील 150 रुपये) आणि GST चा समावेश नाही.
लॉकडाऊननंतर शेड्यूल्ड डोमेस्टिक ऑपरेशन 25 मेपासून उघडले
कोरोना सुरू झाल्यानंतर शेड्यूल्ड डोमेस्टिक ऑपरेशन 25 मार्च 2020 पासून रोखण्यात आले होते. 25 मेपासून हे काही अटी आणि प्री-कोविड लेव्हलच्या तुलनेत एक तृतीयांश क्षमतेसह हळुहळू सुरू करण्यात आले. हवाई भाड्यांवर किमान आणि जास्तीत जास्त मर्यादा घालण्यात आल्या, जेणेकरुन एअरलाइन्स जास्त शुल्क आकारू नयेत आणि हवाई प्रवास फक्त आवश्यक गोष्टींसाठी केला जाईल. 3 डिसेंबर 2020 रोजी, उड्डाणांची क्षमता कोविड-पूर्व पातळीच्या 80% पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ते 70% होते.
काही कंपन्या अजूनही 80% क्षमतेची मर्यादा वाढवू इच्छित नाहीत
नुकतीच क्षमता वाढवण्याविषयी एअरलाइन्सकडून मत घेण्यात आले. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की काही कंपन्यांना आता 100 टक्के क्षमतेसह उड्डाणे सुरू करावयाची आहेत तर काही कंपन्यांना घाई करण्याची इच्छा नाही. व्हायरसची स्थिती काय आहे आणि विमान कंपन्याच्या SOP वरुन 80% पेक्षा जास्त कॅपेसिटीपर्यंत उघडण्यावर विचार केला जाईल.
प्राइस बँड परमानेंट ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही
पुरी म्हणाले की, कमीतकमी आणि जास्तीत जास्त भाडे ही एक अपवादात्मक परिस्थिती आहे. हे मर्यादित उपलब्धतेमुळे हवाई भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ नये म्हणून हे केले गेले. ते म्हणाले की, प्राइस बँड कायम ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आशा आहे की, उन्हाळ्याच्या वेळापत्रकात जेव्हा पूर्व-कोविड स्तरावर उड्डाणे सुरू होतील तेव्हा आम्हाला भाडे मर्यादा पाळण्याची गरज असणार नाही.
मार्चच्या शेवटच्या रविवारीपासून सुरू होईल समर शेड्यूल
देशातील फ्लाइटचे वेळापत्रक दोन भागात विभागले गेले आहे. हिवाळ्याचे वेळापत्रक ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवार ते मार्चच्या शेवटच्या शनिवारपर्यंत आहे. उन्हाळ्याचे वेळापत्रक मार्चच्या शेवटच्या रविवारीपासून ते ऑक्टोबरच्या शेवटच्या शनिवारपर्यंत असते.