स्थैर्य, फलटण, दि. ०३ : निकोप हॉस्पिटल मध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाल्यांनतर रुग्णांच्या नातेवाईकांनी शिविगाळ केल्याचा दावा हा डॉ. जे. टी. पोळ यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलनचा इशारा देण्यात आल्याची माहिती निकोप हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ यांनी दिली.
फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटलमध्ये काल रात्री कोरोनाबाधित रुग्ण दगावला होता. परंतू दगावल्यानंतर रात्र टळूनही दगावलेल्या रुग्णास अंत्यसंस्कारासाठी न हलवल्याने संतापलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. जे. टी. पोळ यांच्या तेथील डॉक्टरांना आणि अधिकार्यांना शिवीगाळ केली असल्याचा दावा डॉ. जे. टी. पोळ यांनी केला. या प्रकारानंतर फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारणार असून संबंधितास अटक होत नाही तोवर काम बंद आंदोलन करणार असल्याचे हि निकोप हॉस्पिटलचे डॉ. जे. टी. पोळ स्पष्ट केले.
फलटणमध्ये सहा ते सात कोव्हीड हॉस्पिटल कार्यरत आहेत. सुमारे ५० ते १०० रुग्ण हे प्रत्येक कोव्हीड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तरुण रुग्ण मृत्यू होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे. आता रेमडीसीव्हर इंजेक्शन व ओक्सीजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. तरी प्रशाशनाने संबंधित घडलेल्या प्रकाराची तातडीने दाखल घ्यावी व कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉ. संजय राऊत यांनी केलेली आहे.
काल कोव्हीडमुळे मृत्यू निकोप हॉस्पिटल मध्ये झालेला आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल येथे शिवीगाळ केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी मला व आमच्या हॉस्पिटल मधील महिला कर्मचाऱ्यांवर अर्वाच भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. आम्ही निकोप हॉस्पिटल येथे नव्याने रुग्ण दाखल करू शकणार नाही व सध्या असलेल्या रुग्णांवर सुद्धा उपचार करू शकणार नाही. प्रशाशनाकडून जो पर्यंत आम्हाला संरक्षण मिळत नाही, तो पर्यंत आम्ही कोणत्याही रुग्णावर उपचार करू शकत नाही, असे मत निकोप हॉस्पिटलचे डॉ. भगत यांनी दिली.