फलटणमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य । दि. 06 जुलै 2025 । फलटण । येथे डॉक्टर्स डे व कृषी दिनाचे औचित्य साधुन जैन सोशल ग्रुपच्या वतीने फलटणमधील ठराविक डॉक्टरांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएनचे मंगेश दोशी तर प्रमुख पाहुणे म्हणुन सिटी बझारचे डॉ. सुर्यकांत दोशी यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. निनाद भुता, डॉ. मिलींद दोशी, डॉ. अलोक गांधी, डॉ. सौ.शिल्पा गांधी, डॉ. गुंजन गांधी, डॉ. सुर्यकांत दोशी, डॉ. प्रितेश दोशी, डॉ. ऋषिकेश राजवैद्य, डॉ. कु. ऐश्वर्या भुता या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

तसेच कुषी दिना निमित्त निवृत्त कृषी अधिकारी तुषार शहा व प्रसिद्ध बागायतदार मंगेश दोशी याचां सत्कार करण्यात आला.

जैन सोशल ग्रुप अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, संचालक डॉ. मिलींद दोशी, तुषार शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, भुता हॉस्पिटलचे डॉ. निनाद भुता, सौ.पुजा भुता यांची विशेष उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!