राजाराम सातपुते यांना ‘डॉक्टरेट’ पदवी


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील व्ही आर बॉयलर चे संचालक राजाराम सातपुते यांनी बॉयलर ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट या विषयावर डयूलियस विद्यापीठ युगांडा (आफ्रिका ) यांच्याकडे प्रबंध सादर केला होता याची दखल घेऊन सातपुते यांना बॉयलर क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी शनिवार 27 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे बहाल करण्यात आली.

या प्रसंगी विद्यापीठ चे उपकुलगुरू (आशिया प्रमुख ) डॉ. रिपु रंजन सिन्हा, विद्यापीठ इंडिया प्रमुख जिडापा ठाविरीत, युगांडा मधील भारतीय उप वाणिज्य दूत डॉ प्रियदर्शनी नायक व विद्यापीठ चे विद्यार्थी समनव्य्क सुधीर गौर व प्राध्यापक, विद्यार्थी आणि बॉयलर क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाराम सातपुते हे स्वतः बॉयलर अटेंडंट असून बारामती एमआयडीसी येथील वी आर बॉयलर च्या माध्यमातून बॉयलर दुरुस्ती, उभारणी, चालविणे हे कार्य करीत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व कमी मनुष्य बळा मध्ये व कमी खर्चात प्रदूषण न होता बॉयलर ची उभारणी होऊ शकते या विषयावर अभ्यास व संशोधन करून यश मिळवले आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.


Back to top button
Don`t copy text!