सातार्‍यात डॉक्टर महिलेचा विनयभंग


स्थैर्य, सातारा, दि.१६: सातारा येथील एका डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन बबन साळुंखे रा. कर्मवीर नगर, सातारा असे संशयिताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, संबंधित महिलेने नितीन साळुंखे याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून नितीन साळुंखे हा महिलेच्या घरासमोर येवून कर्णकर्कश्श हॉर्न वाजून व गाणी मोठ्याने वाजवत होता. तसेच फिर्यादीच्या क्लिनिकसमोर येवून मोठ-मोठ्याने फिर्यादीचे नाव घेवून शिवीगाळ करत होता. त्यामुळे पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर साळुंखेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!