महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे लावायचे का?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१५: मराठा आरक्षणावरून
मराठा क्रांती मोर्चाकडून अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता
लक्षात घेता मुंबईत प्रवेश करणा-या मार्गांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका एसटी बसवरील भगवा झेंडा
पोलिसांनी हटवण्यास सांगितल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. यानंतर आता
विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

‘स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वत:चं आयुष्य पणाला लावलं. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा
जेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय
शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?,’ असा सवाल
भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून आपला
संताप व्यक्त केला. ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेनं दात असलेल्या
एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितला होता.
त्यानंतर एसटी चालकानं हा झेंडा काढल्याचा प्रकार घडला होता.

चंद्रकांत पाटील यांचाही संताप

बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांनीही संताप व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं
आहे की, ‘भगवा काढून बस रवाना केली. धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं
राजकारण करत आहे सरकार? उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर
द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी
अपेक्षा नव्हती’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!