दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । फलटण । फलटण शहरासह तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नये. फलटण पोलीस विभागाचे विशेष पथक सोशल मीडियावर वॉच ठेवत असून जर असे आढळल्यास संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे मत फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी व्यक्त केले.
फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये पोलीस उपअधीक्षक राहुल धस बोलत होते. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी धस म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यांमध्ये विविध घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट या शेअर केल्या जात आहेत. फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोणत्याही जाती व पंथाचे विरोधात किंवा आक्षेपार्ह अशी कोणीही पोस्ट शेअर केली तरी त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
फलटण शहरासह चालू केला शांततेची आगळीवेगळी परंपरा आहे; अशा मध्ये कोणीही जर अनुचित प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केला व त्याच्या पाठीमागे जरी कोणी असले तरी त्याची गय केली जाणार नाही. आगामी काळामध्ये फलटण शहरासह तालुक्यामधील वातावरण दूषित न होऊ देण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत; असेही यावेळी धस यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रास्ताविक व आभार पोलीस निरीक्षक पाटील यांनी मानले.