ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात दि. 13 रोजी फलटण मुक्कामी


दैनिक स्थैर्य । 9 जुलै 2025 । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात रविवार दिनांक 13 रोजी फलटण मुक्कामी येणार असल्याची माहिती श्री संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी दिली.

श्री क्षेत्र पंढरपूर ते क्षेत्र आळंदी येथे गुरुवार दिनांक 10 जुलै ते सोमवार दिनांक 21 जुलै या दरम्यान ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून आळंदीकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे गुरुवार दिनांक 10 रोजी परतीच्या प्रवासात सुरुवात होणार आहे.

यानिमित्ताने दिनांक 10 रोजी सकाळचा विसावा चंद्रभागा नदीवरील येथे होणार असून गोपाळपूर विठ्ठल रुक्मिणी भेट होणार आहे. रात्रीचा मुक्काम वाखरी येथे होणार आहे.

शुक्रवार दिनांक 11 रोजी दुपारचा विसावा तोंडले बोंडले येथे होणार आहे. रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे होणार आहे.

शनिवार दिनांक 12 रोजी सकाळचा विसावा सूतगिरणी खडूस फाटा येथे होणार आहे. दुपारचा विसावा माळशिरस येथे होणार आहे. रात्रीचा मुक्काम नातेपुते येथे होणार आहे.

रविवार दिनांक 13 पालखीचे प्रस्थान होणार असून सकाळचा विसावा धर्मपुरी साधुबुवांचा ओढा येथे होणार आहे. दुपारचा विसावा बरड येथे होणार आहे. रात्रीचा मुक्काम फलटणला होणार आहे.

सोमवार दिनांक 14 रोजी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होणार असून सकाळचा विसावा निंभोरे (सुरवडी) दत्त मंदिर (काळज) येथे होणार आहे. दुपारचा विसावा तरडगाव येथे होणार असून रात्रीचा मुक्काम पाडेगाव येथे होणार आहे.

मंगळवार दिनांक 15 रोजी पाडेगाव येथून पालखीचे प्रस्ताव होणार असून श्रींचे निरास्नान होणार आहे त्याचबरोबर दुपारचा विसावा निरा येथे होणार आहे. वाल्हे ते होणार आहे.

बुधवार दिनांक 16 रोजी वाल्हेतून पालखीचे प्रस्थान होणार असून सकाळचा विसावा दौंडज येथे होणार आहे. दुपारचा विसावा जेजुरी येथे होणार आहे. रात्रीचा मुक्काम सासवड येथे होणार आहे.

गुरुवार दिनांक 17 रोजी सासवड येथून पालखीचे प्रस्थान होणार असून दुपारचे भोजन सासवड येथे होणार आहे व रात्रीचा मुक्काम हडपसर येथे होणार आहे.

शुक्रवार दिनांक 18 रोजी हडपसर येथून पालखीचे प्रस्थान होणार असून दुपारचा मुक्काम पुणे येथे होणार आहे. रात्रीचा मुक्काम भवानी पेठ येथे होणार आहे. शनिवारचा मुक्काम पुणे येथेच होणार आहे.

रविवार दिनांक 20 रोजी पुणे येथून पालखीचे प्रस्थान होणारा असून रात्रीचा मुक्काम आळंदी येथे होणार आहे.

सोमवार दिनांक 21 रोजी आळंदी येथे पालखीची नगर प्रदक्षिणा होणार असून रात्री पालखी माऊली मंदिरामध्ये मुक्कामास जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!