मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही : खा. नवनीत राणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, अमरावती, दि.४: शेतक-यांना पूर आणि
अतिवृष्टीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतक-यांसाठी १० हजार कोटी
रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतक-यांना तातडीने वितरीत करण्याचं
देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. मात्र ही मदत शेतक-यांसाठी तोकडी असून
काही शेतक-यांच्या शेतात अद्याप पंचनामे झाले नसल्याचं खासदार नवनीत राणा
यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका करत
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच शेतक-यांना हेक्टरी ५०
हजारांची मदत देण्याची घोषणा देखील केली होती. राणा म्हणाल्या की,
‘अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे नगदी पीक झ्र सोयाबीनचे पूर्ण हातातून गेले.
यानंतर कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या आला आहे. कपाशीचे
पीकसुद्धा वाया गेले आहे. यामुळे राज्य सरकारने शेतक-यांना सरसकट मदत जाहीर
करावी. दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ५० हजार रुपये जमा
करावी. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!