बेस्ट कर्मचा-यांचीही दिवाळी गोड होणार; 10,100 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.५: ‘बेस्ट’ कर्मचा-यांची दिवाळीही आता गोड होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्टच्या कर्मचारी आणि अधिका-यांसाठी बोनसची घोषणा केली. ‘बेस्ट’ कर्मचा-यांना १०,१०० रुपयांचा बोनस मिळणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वीच अधिकारी आणि कर्मचा-यांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर झाला. त्यानंतर ‘बेस्ट’च्या कर्मचा-यांनीही बोनससाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रत्येकी 10 हजार 100 रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले.

कोरोना काळात बेस्टमधील कर्मचा-यांनी प्रवाशांना ने-आण करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे या भूमिकेतून बेस्टसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या धर्तीवर बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबर 2020 रोजी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!