तडवळे उपसरपंचाविरोधात अविश्वास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२१ । खटाव । तडवळे, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.संगिता भीमराव माळवे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

सौ. माळवे यांच्याविरोधात सरपंच डॉ. प्रकाश पाटोळे व इतर पाच सद्स्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यासंदर्भात तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय तडवळे येथे विशेष सभा घेण्यात आली. त्यामध्ये अविश्वासाच्या बाजूने सहा मते मिळाली. तर विरोधामध्ये एकच मत मिळाले. डॉ. पाटोळे यांच्यासह गणपतराव खाडे, बाळासो पवार, मालन साबळे, अलका पळे, रूपाली खाडे यांनी मतदान केले तर संगीता माळवे उपसरपंच आजच्या बाजूनी एकमेव शरद पाटील यांनी मतदान केले. तर स्वतः उपसरपंच सौ. माळवे व पुष्पा मदने हे दोन सदस्य गैरहजर होते. ग्रामसेवक सस्ते यांनी प्रशासनास सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!