
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील क्राईम रेट नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हाभर ऑल आउट ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यात वाढत्या चोर्या रोखण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने जिल्हाभर ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये 262 एटीएम सेंंटर, शेकडो गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर्सना तपासण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी राबवलेल्या या ऑपरेशनमुळे पोलिसांकडून योग्य रात्रगस्त घालण्यात आली.
जिल्ह्यात राबवलेल्या ऑल आउट ऑपरेशनसाठी 51 पोलीस अधिकारी व 245 पोलीस कर्मचार्यांचा सहभाग होता. रात्रभर पोलिसांची गस्त राहिल्याने कारवाईचाही धडाका झाला. यावेळी संशयास्पदरीत्या फिरणार्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरु ठेवणार्या चार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांना पाहिजे असणार्या चौघांना पकडण्यात आले. 1294 वाहने तपासून 10 केसेस करण्यात आल्या.
दरम्यान, पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त गुन्हे उघड करुन मालमत्तेच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी नाकाबंदी, रात्रगस्त, कोंम्बिग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधक कारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.