दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । सातारा । जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे बक्षिस वितरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांच्या हस्ते झाले.
या बाल महोत्सवात बालगृहातील प्रवेशितांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100, 200 व 400 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बक्षिस वितरण कार्यक्रमा प्रसंगी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, महिला व बाल विकास कार्यालयातील आतिष शिंदे, चेतन भारती, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुचित्रा घोगरे-काटकर आदी उपस्थित होते.